आचरा शिवसेना शिंदेगटतर्फे नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : शिवसेना शिंदेगट आचरातर्फे बुधवार 7 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आचरा तिठा येथे नारळ लढवणे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी प्रथम क्रमांक 10 हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 7 हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्या 128 स्पर्धकांना यात सहभाग घेता येणार आहे.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष तसेच पत्रकार यांचा जाहीर सन्मान करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी मुज्जफर (चावल) मुजावर 9021582818 यांच्याशी संपर्क करावा, अशी माहिती आचरा शिवसेना शाखेचे सचिव पंकज आचरेकर यांनी दिली.

error: Content is protected !!