खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण तलाठी सजा कार्यालयाचे कर्मचारी तथा कोतवाल प्रथमेश प्रकाश गुरसाळे यांना महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने नुकताच संपूर्ण कोकण विभागातून आदर्श महसूल सेवक पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. प्रथमेश गुरसाळे यांचा नुकताच महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महसूल सप्ताह कार्यक्रमात खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालय येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला कुरंगवणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे, खारेपाटण मंडल अधिकारी सरिता बावलेकर, खारेपाटण तलाठी सजा कार्यालयाचे महसूल अधिकारी तथा तलाठी प्रवीण लुडबे, खारेपाटण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गिरीश धुमाळे, प्रा. शिक्षक गायकवाड, नडगिवे गावचे तलाठी विकास चाळके, शेर्पे गावच्या तलाठी अनधा अग्निहोत्री, खारेपाटणचे सहाय्यक कृषी अधिकारी सागर चव्हाण, कुरांगवणे कृषी अधिकारी सौरभ बसापूरे, खारेपाटण पोलीस पाटील आनिकेत चव्हाण, चिंचवली पोलीस पाटील दिगंबर भालेकर, कुरंगवणे पोलीस पाटील देवेन गोसावी, वायंगणी पोलीस पाटील निलेश कदम, वारगाव पोलीस पाटील दिलीप नावळे, नडगिवे पोलीस पाटील जितेंद्र मण्यार, खारेपाटण महा ई सेवा केंद्राचे संचालक भूषण कांबळे, ऋषिकेश राऊत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.












