खारेपाटण रोटरी क्लब ला डॉ.लेणी डि कॉस्टा यांची सदिच्छा भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : रोटरी क्लब चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोट्रियन डॉ लेणी डि कॉस्टा यांनी मंगळावर दि.२७ ऑक्टोबर २०२६ रोजी खारेपाटण येथील रोटरी क्लब ला सदिच्छा भेट दिली. व येथील रोट्रियन पदाधिकाऱ्यांची भेट घेत रोटरी क्लब च्या कामकाजाचा आढावा घेत उपक्रमांची माहिती जाणून घेतली. व समाधान व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. लेणी डि कॉस्टा यांचे पुषगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्रवीण लोकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या समवेत असिस्टंट गव्हर्नर बिनिचंद्र गांधी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. प्रणय तेली, रोट्रियन गांधी मॅडम, यांची प्रमुख उपस्थिती होती. तर खारेपाटण रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष रो. दयानंद कोकाटे, विद्यमान सेक्रेटरी सुबोध देसाई, ट्रेझरियन शर्मिन काझी, रोट्रियन व खारेपाटण हाऊसकुल चे मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेशक संतोष राऊत खारेपाटण सिनियर कॉलेज प्राचार्य व रोट्रियन डॉ. ए.डी कांबळे, रोट्रि. संतोष पाटणकर, सुधीर कुबल, यशवंत रायबागकर, सतीश नाईक, रो.प्रियेशा अमृते, रो.सारिका महिंद्रे, आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ.लेणी डि कॉस्टा यांनी खारेपाटण हायस्कूल येथील रोटरी क्लब खारेपाटण च्या कार्यालयाला भेट दिली व येथील हेल्थ बँक साहित्याची पाहणी केली.तसेच अभिलेख दप्तर नोंदवही तपासली.”खारेपाटण रोटरी क्लब हा नवीन असताना देखील त्यांनी सामाजिक बांधीलकी जोपासता राबविलेले उपक्रम हे जन हिताचे असून अतिशय सुंदर असल्याचे भावपूर्ण उदागार डी जी भेटी दरम्यान डॉ.लेणी डि कॉस्टा यांनी काढले.” तर खारेपाटण रोटरी क्लब ला जास्तीत जास्त मदत करणार असल्याचे देखील यावेळी डॉ.लेणी डि कॉस्टा यांनी सांगितले.

error: Content is protected !!