कणकवली (प्रतिनिधी) : समाजभूषण पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते तथा प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल चे संस्थापक अध्यक्ष संदिप रघुनाथ चौकेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज हळवल गावातील तिन्ही जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वह्या व खाऊवाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे, प्रशांत गावडे. प्राणजीवन सहयोग संस्था सदस्य व सिद्धेश परब. प्राणजीवन सहयोग संस्था सदस्य उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करणे म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करणे होय.
या उपक्रमासाठी वह्या उपलब्ध करून देणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे, कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या मान्यवरांचे आणि या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो.













