कणकवली (प्रतिनिधी) : कल्याण मटका स्वीकारल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी आनंद लक्ष्मण मोहिते याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मोहिते यांच्याकडून रोख रु. 2520 आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई 9 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता करण्यात आली. कणकवली एसटी स्टँड नजीकच्या टपरीत मोहिते मटका स्वीकारताना सापडून आला. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पांडुरंग पांढरे, कॉन्स्टेबल दिग्विजय काशीद यांनी ही कारवाई केली. कॉन्स्टेबल काशीद यांच्या फिर्यादीनुसार आरोपी आनंद मोहिते विरोधात महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियम 1887 चे कलम 12 ( अ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कणकवलीत मटका स्वीकारणाऱ्यावर गुन्हा दाखल












