चिंदर भगवती माऊलीचा हरीनाम सप्ताह 11 ऑगस्ट रोजी…!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावचे जागृत देवस्थान भगवती माऊलीचा वार्षिक सात प्रहराचा हरीनाम सप्ताह सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. सात प्रहराचा हरीनाम सप्ताह सकाळी 10 वाजता सुरु होऊन दुसऱ्या दिवशी मंगळवारी 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत होणार असून दुपारी समारतनाने हरीनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. दशक्रोशीतील नामांकित भजन मंडळे हरिनाम सप्ताहात सहभागी होऊन आपली भजन सेवा सादर करणार आहेत. तरी भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी यांनी केले आहे.

error: Content is protected !!