अवयवदान पंधरवड्यानिमित्त कणकवलीत 11 ऑगस्ट रोजी जनजागृती रॅलीचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा पंधरवडा अवयव दान जनजागृती अभियान म्हणून राबविणेत येणार आहे. त्याचे औचित्य साधून सोमवार दिनांक 11 ऑगस्ट 2025 सोमवार सकाळी 8.00 वाजता अवयवदान विषयी जनजागृती रॅली काढण्यात आहे.या रॅलीमध्ये रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल,तसेच कणकवली पेन्शनर्स असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक संघ कणकवली आणि कणकवली नर्सिंग स्कुल सहभागी होणार आहेत.सकाळी 8.00 वाजता पटवर्धन चौक कणकवली येथून रॅली निघून बाजारपेठ मार्गे कणकवली कॉलेज ग्राऊंड येथे रॅली ची सांगता होईल.त्यानंतर देहदान नेत्रदान तसेच अवयव दान यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!