खारेपाटण हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिन उस्ताहात साजरा

विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्राम महसूल अधिकारी प्रवीण लुबडे यांचा विशेष सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण येथील स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर क्रीडा संकुल मैदानावर भारतीय स्वातंत्र्य दिवस उस्ताहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले सिंधुदुर्गचे सुपुत्र तथा विद्यमान खारेपाटण तलाठी कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी प्रवीण लुबडे यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या या जनरल ध्वजारोहण कार्यक्रमास भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले सैनिक व सध्या महसूल विभागात ग्राम महसूल अधिकारी म्हणून खारेपाटण तलाठी कार्यालयात कार्यकर्त असलेले कर्मचारी प्रवीण लूबडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते भारतीय ध्वज फडकून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

या कार्यक्रमास उपसरपंच महेंद्र गुरव, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, ग्रा. पं. सदस्य सुधाकर ढेकणे, गुरुप्रसाद शिंदे, जयदीप देसाई, किरण कर्ले, शिताजा धुमाळे, मनाली होणाळे, दक्षता सुतार, संस्थेचे उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, संचालक राजेंद्र वरूणकर, मोहन कावळे, विजय देसाई, सिनियर कॉलेज प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर, मंडळ अधिकारी सरिता बोवलेकर, यांसह रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे अध्यक्ष दयानंद कोकाटे, सामाजिक कार्यकर्ते रमाकांत राऊत, मंगेश गुरव, संतोष पाटणकर, संकेत शेट्ये, नंदकिशोर कोरगावकर, खारेपाटण जि. प. केंद्र शाळा नं. १ चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रणय गुरसाळे तसेच सर्व कार्यालयाचे कर्मचारी प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका शिक्षक वृंद सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थी व एन. सी. सी. विभागाच्या वतीने गावात प्रभात फेरी काढण्यात आली. तर खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच खारेपाटण हायस्कूल येथील विद्यार्थ्यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेला ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

error: Content is protected !!