आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या मैदानावर जिल्हास्तरीय शालेय शूटिंग बॉल स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत 17 वर्षे मुली वयोगटामध्ये जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेचा प्रथम क्रमांक आला असून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष सुरेंद्र अन्ना सकपाळ, कार्यवाह अरविंद घाडी, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर, अभिजित धुरे सर्व शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग यांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्हास्तरीय शालेय शूटिंग बॉल स्पर्धेत जनता विद्या मंदिर त्रिंबकची विभागीय स्पर्धेसाठी निवड…!











