वैभववाडी (प्रतिनिधी) : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा वैभववाडी व कृषी विभाग वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव व रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन आत्मा समितीचे अध्यक्ष मंगेश कदम व तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख यांनी केले आहे या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.. रानभाजी महोत्सव स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
वैभववाडीत उद्या रानभाजी महोत्सव व रानभाजी पाककला स्पर्धा












