वैभववाडी (प्रतिनिधी) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पनवेल तालुका युवक अध्यक्षपदी आशिष आत्माराम कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कदम हे वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे गावचे सुपुत्र आहेत. आशिष कदम यांनी २००७ साली कामोठे सेक्टर १६ वॉर्ड अध्यक्ष पासून पक्षाची धुरा सांभाळली होती नंतर कामोठे युवक अध्यक्ष ते आता त्यांचे सामाजिक कार्य पाहून वरिष्ठांनी त्यांना पनवेल तालुका पदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या वतीने व पनवेल महानगर पालिकेचे प्रभारी मोहनिश गायकवाड व जिल्हा प्रवक्ता प्रा. अँड. मोहन गायकवाड आणि पनवेल विधानसभा अध्यक्ष विजय गायकवाड तसेच जिल्हा चिटणीस अशोक (दादया) निकम महानगर पालिका क्षेत्र उपाध्यक्ष प्रभू जाधव यांच्या प्रयत्नांनी झाली आहे.
आरपीआय आठवले पक्षाचे पनवेल तालुकाध्यक्षपदी आशिष कदम यांची नियुक्ती












