वैभववाडी (प्रतिनिधी) : कोल्हापूर गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर मांडूकली या ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दस्तुरी चौक, कळे येथे बॅरिकेट लावून गगनबावड्याकडे जाणारी वाहने परत पाठवण्यात येत आहेत. तसेच कोल्हापूर – राजापूर हा राज्य मार्ग सुद्धा बाजारभोगाव या ठिकाणी पाणी आल्यामुळे बंद झाला आहे. बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग – कोल्हापूर महामार्गावर मांडूकली येथे रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद











