मंगेश गुरव यांच्यावर कणकवली शिवसेना तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी

आमदार निलेश राणे यांनी नियुक्ती केली जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना आमदार निलेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघात खांदेपालट केला असून सहा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज शिवसेना कणकवली संपर्क कार्यालयातील पत्रकार परिषदेत जाहीर केल्या. शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी खारेपाटण येथील मंगेश गुरव यांच्यावर सोपवली असून शिंदे गट शिवसेना स्थापन झाल्यापासून निष्ठेने कार्यरत असलेल्या मंगेश गुरव यांना पक्षनेतृत्वाने न्याय दिला आहे. मंगेश गुरव हे सध्या कणकवली उपतालुकाप्रमुखपदी कार्यरत होते. पक्षसंघटनेसाठी झटून काम केले आहे. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते, फोंडाघाट सरपंच संजना आग्रे उपस्थित होते.

error: Content is protected !!