अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला धीरगंभीरतेने सामोरे जाण्यासाठी हे प्रशिक्षण – शिबिर कमांडर

फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकातर्फे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेले कित्येक दिवस कोसळणारा पाऊस, घाट पायथ्यालगतची कुटुंबे, भूस्खलन, पूरस्थिती, वादळवारा याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत सह्याद्री डोंगरदर्‍याच्या पट्ट्यात, घाट पायथ्याशी वसलेल्या, फोंडाघाट मध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास येथील ग्रामस्थ,युवाई, तरुण मंडळे, कारागीर, बचत गट, शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य, महसूल विभाग यांना सतर्क करून, माहिती देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद पथकातर्फे प्रशिक्षण देण्यात आले. शिबिराचे प्रास्ताविक, आलेल्या टीमचे मान्यवरांचे हस्ते स्वागत आणि सूत्रसंचालन श्रिया शिंदे यांनी केले.

यावेळी सरपंच संजना आग्रे, तन्वी मोदी, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, मंडल अधिकारी प्रवीण मोंडे, ग्रामपंचायत सदस्य- पिंटू पटेल, पवन भोगले, पवन भालेकर, प्राची धुरी, पोलीस पाटील सुधीर तेली, फोंडा तलाठी समृद्धी गवस, पंचक्रोशीतील तलाठी श्रिया शिंदे, गोजिरी गोंडे ,अमृता भुसके, गणेश शिंदे,कोतवाल- पांडुरंग राणे,कदम,सहाय्यक शितल पारकर, सोसायटी चेअरमन राजन नानचे, कृषी सहाय्यक अक्षया परब, हेल्प अकॅडमीचे संजय नेरुरकर, आरोग्य विभाग विभागाचे विजय मस्के, पत्रकार संजय सावंत आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापन टीमचे कमांडर आर जे यादव (भूकंप व माहिती) सय्यद अझर (भूस्खलन व वीज पडणे) माधव झेंडे (पूर नियंत्रण व त्याची तयारी) छत्रपती खांडवे (ब्लड कंट्रोल व इजा) वाल्मीक चिमटे, (आग आणि उपाययोजना) यांचे नेतृत्वाखाली सहकारी मुकुंद साळुंखे, विजय मस्के, अवधूत शिंदे, उज्वला, प्रीती, तगड शार्त, सोमनाथ घोरपडे, नितीन वाघमारे, षणमुख डी.एम. यांनी विविध विभागात उद्भवणाऱ्या आपत्कालीन घटना,याविषयीची जागरूकता आणि प्रसंगावधान राखून त्यावर तातडीची उपाय योजना याच्याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांना माहिती दिली व सतर्क केले. आपत्कालीन घटना अचानक घडतात. समाजाने सामाजिक बांधिलकी राखून, अतिरेक न करता, शांतचित्ताने प्राथमिक उपचार ही त्यावेळची गरज असते. याबाबत सर्वांना सजग करण्यासाठी हे प्रशिक्षण आहे असे माहितीपर मार्गदर्शन, कमांडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. शिबिराचे आभार प्रदर्शन प्रवीण मोंडे व समृद्धी गवस यांनी केले.

error: Content is protected !!