स्वच्छ घर, परिसर आणि गणेशोत्सव स्पर्धेचेचे सलग 5 व्या वर्षी आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : आदर्श व स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत लोरे नं.1 गाव दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवून शासनाच्या विविध स्पर्धामध्ये सक्रिय भाग घेऊन गाव विकासाच्या प्रक्रियेमध्ये पुढे राहण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून लोरे नं.1 गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत सर्वात पुढे राहण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत सलग 5 व्या वर्षी स्वच्छ घर व परिसर आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा सन 2025 या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत लोरे नं.1 स्वच्छ, समृद्ध व पर्यावरणस्नेही गांव हे उद्दीष्ट साध्य करावयाचे आहे. स्वच्छ घर व परिसर स्पर्धे अंतर्गत भाग घेणाऱ्या कुटंबांचे परिक्षण होणार असून प्रत्येक प्रभाग निहाय तीन क्रमांक निवडून त्यांना योग्य ते प्रोत्साहन बक्षिस ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणार आहे. तसेच पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धेत भाग घेणाऱ्या कुटंबांचे परिक्षण होणार असून त्यामधून तीन क्रमांक निवडण्यात येणार आहेत व त्यांना प्रोत्साहन पारितोषिक देण्यात येणार आहे. तरी गावातील सर्व कुटंबांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन आपले लोरे नं.1 गांव स्वच्छ, समृद्ध व पर्यावरणस्नेही करण्यासाठी याद्वारे आवाहन करण्यात येत आहे.










