माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंनी स्वखर्चाने नाथ पै नगर गणपती साना रस्ता केला खड्डेमुक्त

जळकेवाडी नाथ पै नगरवासियांना दिला शब्द केला पूर्ण

कणकवली (प्रतिनिधी) : माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंनी स्वखर्चाने कणकवली शहरातील नाथ पै नगर गणपती साना रस्त्याची दुरुस्ती करत हा रस्ता खड्डेमुक्त केला. कणकवली शहरातील नाथ पै नगर जळकेवाडी येथील रहिवासी गणपती विसर्जन नाथ पै नगर येथील गणपती साना येथे करतात. मात्र हा रस्ता खड्डेमय झाल्यामुळे बाप्पाच्या आगमनापूर्वीच स्थानिक रहिवाशांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे लक्ष वेधले होते. गणपती साना रस्त्याची दुरुस्ती करून मिळावी अशी मागणी केली होती. समीर नलावडे यांनी तात्काळ स्वखर्चाने या रस्त्याची डागडुजी करून घेत रस्ता खड्डेमुक्त केला. भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, अमोल रासम यांनी स्वतः देखरेख करून रस्त्याची दुरुस्ती करून घेतली. याबद्दल नाथ पै नगर आणि जळकेवाडी येथील नागरिकांकडून समीर नलावडे यांचे आभार व्यक्त होत आहेत.

error: Content is protected !!