खारेपाटण एस टी बस स्थानक आवारात लावण्यात येणार मोठा विद्युत एल ई डी हॉलेजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण शहरात नव्याने कार्यरत झालेला रॉयल ब्रदर्स खारेपाटण या ग्रुपच्या वतीने ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर सामाजिक बांधिलकी जपत खारेपाटण एस टी बस स्थानक आवारात विद्युत पोलवर लावण्यासाठी मोठा विद्युत एल ई डी हॉलेजन सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव व किरण गुरव तसेच तुषार कोळसुलकर यांच्या सौजन्याने नुकताच गावासाठी भेट देण्यात आला असून यामुळे खारेपाटण एस टी बस स्थानक परिसर रात्रीचा झळाळून निघणार आहे.
रॉयल ब्रॅदर्स ग्रुप खारेपाटण यांचे वतीने युवा उद्योजक किरण गुरव यांच्या प्रमुख उपस्थित व त्यांच्या शुभहस्ते सदर एल ई डी विद्युत हॉलेजन खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर कोरगावकर व भाऊ राणे यांचेकडे गावासाठी भेट देण्यात आला.यावेळी रॉयल ग्रुप चे तुषार कोळसुलकर,महेश कोळसुलकर,संकेत शेट्ये,दिगंबर राऊत,सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये,संतोष पाटणकर, वसीम मुकादम,कर्ले,श्री घेवडे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शेखर शिंदे,चिन्मय कोळसुलकर गणेश कारेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण येथे समाजातील दानशूर व्यक्तीकडून आशा प्रकारे समाजोपयोगी साधने भेट देण्यात येत असल्याने रॉयल ब्रॅदर्स ग्रुप खारेपाटण चे खारेपाटण ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.










