गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण येथे आरोग्य पथक कार्यरत

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई हून कोकणात येणाऱ्या गणेशभक्त चाकरमान्यांच्या स्वागतासाठी व आरोग्य सेवेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण पोलिस चेक पोस्ट येथे कणकवली तालुका आरोग्य विभागाअंतर्गत खारेपाटण प्राथमिक आरोग्याच्या वतीने दिनांक २३ ऑगस्ट २०२५ पासून आरोग्य पथक कार्यरत ठेवण्यात आले असून चाकरमानी प्रवासी गणेशभक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा.असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीमती इंगवले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गवर खारेपाटण पोलिस चेकपोस्ट येथे दि.२३ ऑगस्ट २०२५ ते २६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत गणेश भक्तांच्या सेवेसाठी दोन सत्रात कार्यरत ठेवण्यात आलेल्या या आरोग्य पथकात खारेपाटण,कासार्डे व नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सकाळी ८ ते दुपारी २ तर दुपारी २ ते रात्री ८ अशी ही पथके गणेश भक्तांच्या सेवेसाठी यावेकेत कार्यरत राहणार आहेत.

खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक पी एस भागवत व के एस वानोळे यांसह या पथकामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी स्नेहा जाधव, प्रणाली बाणे, सुमित बजेद्री,ऋषी माने,डॉ.धनश्री जाधव,गौरव देवस्थळी तर आरोग्य सेवक मिथुन गेडाम,आर जी नायकोजी,गणेश तेली,निलेश सामंत व आरोग्य सेविका दीपाली दुखंडे यांचा समावेश करण्यात आला आहे.

error: Content is protected !!