भारतीय जनता पार्टी खारेपाटण आयोजित व सतीश गुरव पुरस्कृत स्वागत कक्षाचे उद्घाटन

खारेपाटण येथे गणेश भक्त चाकरमान्यांसाठी चहा, पाणी व बिस्कीटची व्यवस्था

खारेपाटण (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या गणेशभक्त मुंबईकर चाकरमान्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हाच्या प्रवेशद्वारावर व मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे भारतीय जनता पार्टी खारेपाटण आयोजित व सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक सतीश गुरव पुरस्कृत स्वागत कक्षाचे उद्घाटन आज भाजपा कणकवली तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी मुंबईवरून येणाऱ्या गणेशभक्तांना चहा, पाणी, बिस्कीटची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती.

यावेळी भाजप पक्षाचे कार्यकर्ते व माजी जि.प. सदस्य रवींद्र जठार, माजी सरपंच रमाकांत राऊत, शक्तीकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर, सुधीर कुबल, प्रवीण लोकरे, नंदकिशोर कोरगावकर, इस्माईल मुकादम, किरण गुरव, तेजस राऊत, मोहन पगारे, शिवसेना कणकवली तालुका अध्यक्ष मंगेश गुरव, सामाजिक कार्यकर्ते सुकांत वरूणकर, संतोष पाटणकर, संकेत शेट्ये, गुरुप्रसाद शिंदे, लियाकत काझी, अशपाक हाजू, जितेंद्र खामकर, महिला कार्यकर्त्या आरती गाठे, शेखर शिंदे, शेखर कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबईवरून गणेश चतुर्थीसाठी कोकणात येणाऱ्या गणेश भक्त चाकरमानी व एस. टी. चालक व वाहक यांना प्रवास करून थोडा उसंत मिळावा यासाठी खारेपाटण येथे भाजप पक्षाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात असून त्यांना चहा, बिस्कीट आणि पाणी देऊन पुढील सुखरुप प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. या उपक्रमाचे प्रवासी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या कक्षाच्या उद्घाटनावेळी भाजप पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!