दशावतार कलाकार मोफत आरोग्य तपासणी शिबीर 10 सप्टेंबर रोजी कणकवलीत

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील दशावतार कलाकारांची आरोग्य तपासणी बुधवार दि. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात होणार आहे. तालुक्यातील सर्व दशावतारी कलाकारांनी दिनांक 10 सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे वेळीच उपस्थित रहावे. या आरोग्य शिबिरात सर्व तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. येताना अगोदरचे काही ट्रिटमेंट चालू असेल तर रिपोर्ट घेऊन येणे, तसेच आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड काढावयाचे असल्यास आधार कार्ड व रेशनकार्ड घेऊन यावे, असे आवाहन कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी केले आहे.

error: Content is protected !!