कणकवली (प्रतिनिधी) : असलदे धनगरवाडी येथे अचानक विजेच्या तारा तुटून पडल्याने गावात वीज प्रवाह खंडित झाला होता. तातडीने कारवाई करत सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब व सदस्य दयानंद हडकर यांच्या पुढाकाराने तुटलेल्या पोलच्या ठिकाणी नवीन पोल उभारण्यात आला. तसेच विजेच्या तारांना अडथळा ठरणारे वृक्ष कापून जेसीबीच्या सहाय्याने काम सुरू करण्यात आले.
यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच दयानंद हडकर, ग्रामविकास अधिकारी संजय तांबे, तंटामुक्ती अध्यक्ष रुपेश खरात, शिपाई मधुसूदन परब, नळ कामगार प्रकाश वाळके, सत्यवान घाडीगावकर, विद्युत कर्मचारी पाटील आणि धनगरवाड्यातील ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या सक्रिय सहकार्यामुळे विजेचा प्रवाह पुन्हा सुरू करण्यात आला असून या तातडीच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.












