ब्युरो व्हेरीटास व सेवा सहयोग फाउंडेशन संस्थेचा उपक्रम
खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई,अंधेरी येथील ब्युरो व्हेरीटास india कंपनीच्या CSR फंडातून व सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण येथील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेतील सुमारे ८२ विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैशणिक साहित्याचे वाटप आज बुधवार दि.१० सप्टेंबर २०२५ रोजी ब्युरो व्हेरीटास india कंपनीच्या हेड ऑफ प्रॉक्यूरमेंट शांता पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
खारेपाटण केंद्र शाळेच्या सभागृहात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष श्रीम.प्राप्ती कट्टी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला ब्युरो व्हेरीटास india कंपनीचे हेड ऑफ अँडमिनिस्ट्रेशन मिलिंद पाटील तसेच या शाळेचे माजी विद्यार्थी व कंपनीचे अँडमिनिस्ट्रेशन मॅनेजर पुरुषोत्तम देवधर,सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई या सामाजिक संस्थेचे विशाल देसाई,संस्थेचे गणेश भाबल,खारेपाटण केंद्र शाळेचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर सदस्य मंगेश ब्रम्हदंडे,संध्या पोरे,खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण केंद्र शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.’ खारेपाटण सारख्या ग्रामीण भागात अशा प्रकारची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सर्वांग सुंदर असणे.आणि अशा ज्ञान मंदिरात आम्हाला यायला मिळणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो. तर विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी चांगले गुण बाळगून खूप मोठे व्हावे.’ असे भावपूर्ण उदगार ब्युरो व्हेरीटास india कंपनीचे हेड ऑफ प्रॉक्यूरमेंट शांता पुजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले.तर शाळेचे माजी विद्यार्थी व कंपनीचे कंपनीचे अँडमिनिस्ट्रेशन मॅनेजर पुरुषोत्तम देवधर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याची हिंमत अंगी बाळगावी असे सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी स्वास्तकलेतून बनविलेल्या आकर्षक वस्तू प्रमुख पाहुण्यांना आठवण म्हणून विद्यार्थ्यांनी भेट दिल्या.यावेळी शाळेच्या शिक्षिका अलका मोरे,समीधा राऊत,आरती जोजेन,चव्हाण, मिलिंद सरकटे,शीतल राठोड,अबीदा काझी आदी शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेचे उच्च श्रेणीं मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी मानले.










