तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत अर्जुन रावराणे विद्यालयाचे घवघवीत यश

वैभववाडी (प्रतिनिधी) : क्रीडा व युवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा कोकिसरे हायस्कूल येथे संपन्न झालेल्या १७ वर्षाखालील मुलांच्या तालुकास्तरीय फुटबॉल क्रीडा प्रकारात अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करून विजय मिळवला असून विद्यालयाचा संघ जिल्हास्तरावर वैभववाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

यशस्वी संघाचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर बी. एस. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच या संघाला प्रशालेचे क्रीडा शिक्षक तुळसणकर एस. टी. यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!