काळसे येथे दुर्गामातेची मूर्ती प्रतिष्ठापना करून नवरात्रौत्सवास प्रारंभ

सलग १९ व्या वर्षी बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे आयोजन

चौके (प्रतिनिधी) : काळसे रवळनाथ मंदिर नजीक बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळसे-धामापूर यांच्या वतीने प्रतीवर्षीप्रमाणे या वर्षीही दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ ते ०३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नवरात्रौत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त दररोज सकाळी देवीची नित्यपूजा, दररोज दुपारी ०१:०० वाजता महाआरती, सायंकाळी ७:०० वाजता महाआरती आणि सायंकाळी ७:३० वाजता भजन अशी नित्यसेवा आयोजित करण्यात आली आहे. बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने नवरात्रौत्सव साजरा करण्याचे हे १९ वे वर्ष आहे.

दरम्यान आज सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी वाजत गाजत मिरवणूकींने दुर्गामातेची मूर्ती उत्सव स्थळी आणण्यात आली आणि दुर्गामातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सायं. ७:३० वाजता श्री. रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ काळसे बुवा अभिजित परब यांचे भजन होणार आहे आणि रात्रौ ९:०० वाजता गरबा व दांडिया नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार २३ सप्टेंबर रोजी सायं. ७:३० वाजता श्रीकृष्ण प्रासा. भजन मंडळ आनंदव्हाळ बुवा पप्पू सामंत यांचे भजन, रात्रौ ९ वाजता दांडिया व गरबा नृत्य, बुधवार २४ सप्टेंबर रोजी सायं. ७:३० वाजता ब्राम्हणदेव भजन मंडळ पिंगुळी बुवा प्रसाद प्रभु-तेंडोलकर यांचे भजन, रात्रौ ९:०० वाजता योगेश राऊळ पुरस्कृत सखी फुगडी संच पावशी यांचा फुगडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी सायं. ७:३० वाजता घुमडाई प्रासादिक भजन मंडळ घुमडे बुवा नाना सामंत यांचे भजन, रात्रौ ९:०० वाजता हॉटेल मराठा (महेश परब) पुरस्कृत जय हनुमान पारंपारीक दशावतार नाट्यमंडळ, आरोस यांचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे.

शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी सायं. ७:३० वाजता सद्गुरू संगीत भजन मंडळ कुडाळ बुवा वैभव सामंत यांचे भजन, रात्रौ ९:०० वाजता गरबा व दांडिया नृत्य. शनिवार २७ सप्टेंबर रोजी सायं. ७:३० वाजता गजानन प्रासा. भजन मंडळ काळसे, बुवा प्रमोद करलकर आणि दुर्वांकुर भजन सेवा काळसे, बुवा गणेश गोसावी अशी दोन भजने, रात्रौ ९:०० वाजता एम. आय. डी. सी. कुंभारवाडा शाळेतील मुलांचे गोफनृत्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रविवार २८ सप्टेंबर रोजी सायं. ७:३० वाजता सातेरी प्रासादिक भजन मंडळ, पावशी बुवा अरुण घाडी यांचे भजन, रात्रौ ९:०० वाजता गरबा व दांडिया नृत्य, सोमवार २९ सप्टेंबर रोजी सायं. ७:३० वाजता श्री विश्वकर्मा प्रासा. भजन मंडळ धामापूर, बुवा प्रकाश थवी यांचे भजन. रात्रौ ९:०० वाजता संतोष सावंत पुरस्कृत आकर्षक वेषभुषा स्पर्धा, मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सायं. ७:३० वाजता विश्वकर्मा प्रासा. भजन मंडळ, वायरी बुवा अक्षय परुळेकर, यांचे भजन, रात्रौ ९:०० वाजता गरबा व दांडिया नृत्य, बुधवार ०१ ऑक्टोबर रोजी दुपारी १:०० वाजता महाप्रसाद, सायं. ७:०० वाजता महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम व देवी कडील साड्यांचा लकी ड्रॉ, सायं. ७:३० वाजता श्री. सिद्ध महापुरुष प्रासा. भजन मंडळ काळसे गोसावी वाडी, बुवा राजेंद्र गोसावी यांचे भजन, रात्रौ ९:०० वाजता गरबा व दांडिया नृत्य, गुरुवार २ ऑक्टोबर रोजी सायं ७:०० वाजता श्री रवळनाथ प्रासा. भजन मंडळ काळसे, बुवा चैतन्य सातार्डेकर यांचे भजन, रात्रौ ९:०० वाजता गरबा व दांडिया नृत्य आणि शुक्रवार ३ ऑक्टोबर रोजी सायं. ४ वाजता महा आरती व भव्य विसर्जन मिरवणूक यामध्ये प्रताप चव्हाण पुरस्कृत विजय म्युझिकल्स, वराड यांचे खास आकर्षण असणार आहे.

अशा प्रकारे नवरात्रौत्सवानिमित्त बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने भरगच्च धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!