उद्या कोल्हापुरात रंकाळा तलाव येथे दुपारी पारंपरिक होड्यांच्या भव्य स्पर्धेचे आयोजन

शाही दसरा महोत्सव २०२५

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सव २०२५ मध्ये उद्या रंकाळा तलाव येथे दुपारी ३ ते ५ वाजता होड्यांच्या स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन कोल्हापूर आणि कृष्णाई वॉटर स्पोर्ट्स, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक होड्यांच्या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूरच्या क्रीडाप्रेमींसाठी आणि स्थानिक स्पर्धकांसाठी ही शर्यत म्हणजे आपल्या जलशक्तीचे प्रदर्शन करण्याची एक मोठी संधी असणार आहे.

या स्पर्धेत विजेत्यांवर रोख बक्षिसे, मानाचे निशाण आणि भव्य चषक यांची लयलूट होणार आहे. या स्पर्धेतील बक्षिसांची रचना अतिशय आकर्षक आहे. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला तब्बल ₹ २५,०००/- रोख, निशाण आणि चषक मिळणार आहे. तर द्वितीय क्रमांकासाठी ₹ २१,०००/- आणि तृतीय क्रमांकासाठी ₹ १५,०००/- रोख बक्षीस निश्चित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त चौथ्या क्रमांकासाठी ₹ ११,०००/- आणि पाचव्या क्रमांकासाठी ₹ ९,०००/- रोख बक्षीस ठेवण्यात आले आहे. केवळ पहिल्या पाचच नव्हे, तर सहभागींना देखील प्रत्येकी ₹ ५,०००/- रोख बक्षीस, निशाण व चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे.

या शर्यतीमुळे कोल्हापूरच्या पारंपरिक जलक्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळणार असून, स्पर्धा पाहण्यासाठी पर्यटक, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!