आंब्रड गावचे सुपुत्र, मेरीटाईम शिपिंग कंपनीचे जी.एम. मंगेश मोरजकर यांचे निधन

कुडाळ (प्रतिनिधी) : आंब्रड गावचे रहिवासी व मुंबई येथील मेरीटाईम शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडचे जनरल मॅनेजर मंगेश यशवंत मोरजकर (68) यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले. मंगेश मोरजकर हे आंब्रड गावातील बाजार हितवर्धक मंडळाचे अनेक वर्ष कार्याध्यक्ष होते. मोरजकर मुंबईत हे उच्च पदावर असले तरी त्यांनी गाव विकासासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. गावातील विविध उपक्रम व देवस्थान विषयक ते नेहमी जागृत असत. प्रत्येक उपक्रमात त्यांचे योगदान मोठे असे. त्यांचे संगीत क्षेत्रातही मोठे योगदान आहे. तरुणांना एकत्र करून त्यांनी भजन मंडळी स्थापन केली होते. भजनीबुवा म्हणून त्यांची या परिसरात ओळख होती. सदा हसतमुख, प्रसंगी मदतीला हात पुढे करणारे व नियमित उदारवादी असल्याने त्यांना आंब्रड गाव व परिसरातील लोक मंगेश भाई म्हणून ओळखत असत.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, भाऊ, वहिनी, पुतण्या असा मोठा परिवार आहे. कणकवली शहरातील भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते बाळा माणगावकर व न्यायालयाचे अधीक्षक महेश माणगावकर यांचे मामा होत.

error: Content is protected !!