एक पोलिस अधिकारी व एक कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस दलावर एसीबीच्या पथकाने आज धाड टाकली आहे. या धाडीत एक पोलिस अधिकारी व एक कर्मचारी असे दोघे पथकाच्या जाळ्यात अलगद सापडले आहेत. या धाडीमुळे वैभववाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. वैभवाडी पोलीस ठाण्यात त्या लाचखोर आरोपीवर कारवाई सुरू आहे.