खारेपाटण केंद्रांतर्गत शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण मेळावा नडगिवे जि.प शाळा नं.१ येथे संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळातील शिक्षक व अंगणवाडी सेविका / मदतनीस यांचा शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण मेळावा नुकताच जि.प शाळा नडगिवे नं.१ या शाळेत संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घघाटन नडगिवे गावचे उपसरपंच भूषण कांबळे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी खारेपाटण केंद्राचे केंद्र प्रमुख सद्गुरू कुबल, खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष पाटणकर,नडगिवे जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटकर,तसेच या प्रशिक्षण वर्गाला तज्ञ मार्गदर्शक म्हणून खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ चे वरिष्ठ श्रेणी मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर सर व नडगिवे जि.प.शाळा नं.२ च्या शिक्षिका मैथिली पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पूर्व प्राथमिक वर्गाची तयारी होण्याकरिता शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण शिबिर तथा मेळावात विद्यार्थ्यांचा शारीरिक,सामाजिक, बौद्धिक विकास होण्याच्या दृष्टीने विविध स्टॉल ७ स्टॉल ची मांडणी प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी केली होती. इयत्ता पहिली मध्ये दाखल होणारी मुले व अंगणवाडी सेविका यांनी प्रत्येक स्टॉल भेट देऊन शाळा पूर्व तयारीच्या प्रात्यक्षिक मध्ये विद्यार्थ्यांसह सहभाग घेतला. यामध्ये खारेपाटण केंद्र शाळा नं.१ या शाळेने – नवणोदणी व शाळा प्रवेश,खारेपाटण टाकेवाडी शाळेने – विद्यार्थ्यांचा शारिरीक विकास, खारेपाटण हसोळ टेंब शाळेने – बौद्धिक शमता,खारेपाटण रामेश्वर नगर शाळेने – सामजिक व भावनिक विकास,नडगिवे शाळा नं.१ने – भाषा विकास,नडगिवे शाळा नं.२ ने – गणन पूर्व तयारी तर खारेपाटण उर्दू शाळेने – समुपदेशन आदी विषयवार विविध स्टॉलची उभारणी करून सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्याकरिता अशी शाळा पूर्व तयारी प्रशिक्षणे होणे काळाची गरज असून अंगणवाडी ताईची भूमिका देखील यामध्ये महत्वाची आहे.यामध्ये विद्यार्थी सर्वांगीण विकास केंद्रस्थानी ठेऊन समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकातील मुलांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणून त्यांचा सर्वागीण विकास करणे खऱ्या अर्थाने गरजेचे आहे. असे भावपूर्ण खारेपाटण केंद्र शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते व शिक्षण तज्ञ संतोष पाटणकर यांनी या मेळाव्यात उपस्थित शिक्षक व अंगणवाडी सेविका यांना मार्गदर्शन करताना काढले. या मेळाव्याला तज्ञ मार्गदर्शक प्रदीप श्रावणकर सर व मैथीली पवार यांनी उपस्थितांना सुयोग्य अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच नडगिवे उपसरपंच भूषण कांबळे,नडगिवे शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटकर यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त करत मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. या मेळाव्याचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी केले.व संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वायगणी जि.प.शाळेचे शिक्षक तूपविरे सर यांनी केले. तर सर्वांचे आभार खारेपाटण केंद्र शाळेच्या शिक्षिका रेखा लांघी यांनी मानले.

error: Content is protected !!