नालासोपारा स्टेशन जवळ हातात जंतू पडलेल्या निराधार बांधवाला समर्थ आश्रम विरार ने दिला आधार

संदीप परब यांनी स्वतः निराधार व्यक्तीच्या जखमेतील किडे साफ करून दिला समाजाला आदर्श

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई उपनगरातील नालासोपारा रेल्वे स्टेशन जवळ परिसरात पांडुरंग नामक व्यक्ती वय ३२ वर्षे असलेला निराधार युवक गेल्या दोन महिन्यापासून त्याच्या उजव्या हाताला जखम होऊन विव्हळत पडलेला होता. उपचाराअभावी त्याची जखम चिघळत जाऊन त्यामध्ये किडे पडले होते. ही बाब जीवन आनंद संस्थेच्या संदीप परब यांना समजताच त्यांनी तातडीने या निराधार बांधवांवर प्राथमिक उपचार करून व स्वच्छता करून त्याला समर्थ आश्रम विरार येथे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, नालासोपारा स्टेशन येथे आढळले निराधार बांधव पांडुरंग हे दोन महिन्यापूर्वी त्याच्या उजव्या हाताला विजेचा शॉक लागून जखमी झाले होते. सदर जखमेवर आर्थिक परिस्थिमुळे व दुर्लक्षतेमुळे उपचार करू न शकल्याने त्यांच्या हातातील जखमेत किडे पडले होते. तर त्यांच्या हाताची काही बोटे किड्यांनी अर्धी खाऊन संपविली होती. या भयंकर जखमेने विव्हळत पडलेल्या पांडुरंगाची माहिती १२ ऑक्टोंबर २०२५ ला जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदीप परब यांना समजताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनसह नालासोपारा स्टेशन ला पोहचून सदर व्यक्तीला आंघोळ घालून त्याची जखम स्वच्छ करण्यात आली. संदीप परब यांनी स्वतः या व्यक्तीच्या जखम झालेल्या हातातील किडे साफ करून तसेच त्याची दाढी केस कापून स्वच्छ कपडे घालून पोलिसांच्या परवानगीने विरार येथील समर्थ आश्रमात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

यावेळी स्वानसेवक गोविंद गार्गी आणि शैलेंद्र कदम यांचे विशेष सहकार्य लाभले. समाजात सध्या माणुसकी हरवत चालली असून, “जगी ज्याचे कोणी नाही त्याचा देव आहे.” या उक्ती प्रमाणे संदीप परब हे रस्त्यावरील निराधार बांधवांसाठी सातत्याने कार्य करत असतात. त्यांच्या या मानवतेला बळकटी देणाऱ्या कार्यामुळे नालासोपारा स्टेशन परिसरात आढळलेला जखमी निराधार बांधव पांडुरंग याच्या हाताची उर्वरित बोटे तरी वाचतील आणि त्याच्या जगण्याला एक वेगळा आयाम मिळेल. या कामी ज्यांनी सहकार्य केजे त्या सर्वांचे आभार श्री संदीप परब यांनी व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!