वैभववाडी तालुक्यातील सहा पंचायत समिती मतदारसंघांची आरक्षण सोडत जाहीर

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सहा पंचायत समिती मतदार संघापैकी तीन मतदार संघ महिलांसाठी तर तीन मतदार संघ सर्वसाधारण प्रवर्ग असे आरक्षण पडले आहे. सहा पैकी कोकिसरे पंचायत समिती मतदार संघ हा ना. मा. प्र. महिलांसाठी राखीव पडला आहे. तर उर्वरित पाच पैकी भुईबावडा पंचायत समिती मतदार संघ – सर्वसाधारण, कोळपे पंचायत समिती – सर्वसाधारण महिला, उंबर्डे पंचायत समिती – सर्वसाधारण महिला, खांबाळे पंचायत समिती – सर्वसाधारण, लोरे पंचायत समिती मतदार संघ – सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहे.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आल्या. वैभववाडी तालुक्यातील सहा पंचायत समिती मतदार संघासाठी तहसील कार्यालय वैभववाडी येथे उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, तहसीलदार सूर्यकांत पाटील, नायब तहसीलदार (महसूल ) सचिन निकम, सुशांत फाळके, कांचन घाडी आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार प्रथम सहापैकी एक ओबीसी मतदारसंघ निश्चित करण्यासाठी इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी कृतिका पवार हिच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये कोकिसरे पंचायत समिती मतदार संघ हा ना. मा. प्र. साठी आरक्षित झाला. यामध्ये पुन्हा महिला की पुरुष यासाठी सोडत काढण्यात आली असता, हा मतदार संघ ना. मा. प्र. महिलांसाठी आरक्षित झाला.

तर उर्वरित पाच पंचायत समिती मतदार संघापैकी कोळपे, उंबर्डे हे दोन पंचायत समिती मतदार संघ हे सर्वसाधारण महिलांसाठी तसेच भुईबावडा, खांबाळे, लोरे हे तीन मतदार संघ सर्वसाधारण मतदारसंघ म्हणून घोषित झाले आहेत.

या आरक्षण सोडतीवेळी यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, शिवसेना तालुकाप्रमुख नंदू शिंदे, संजय सावंत, राजेंद्र राणे, महेश संसारे, रितेश सुतार यांच्यासह मोठ्या संख्येने राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!