डी. टी. एस.इ. मार्फत घेतली जाणारी इस्रो अंतराळ प्रदर्शन भेट परीक्षा उत्साहात संपन्न

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : DTSE मार्फत घेतली जाणारी इस्रो अंतराळ प्रदर्शन भेट परीक्षा काल महाराष्ट्रातील सहा केंद्रावरती उत्साहात पार पडली. डायमंड टॅलेंट सर्च एक्झामिनेशन मार्फत दरवर्षी नर्सरी ते आठवीच्या सर्व माध्यमाच्या मुलांची शाळेमध्ये परीक्षा घेऊन तालुक्यातून क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो अंतराळ प्रदर्शन भेट परीक्षा देण्याची संधी मिळवून दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर क्रमांक मिळवलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची इस्रो अंतराळ प्रदर्शन भेट परीक्षा काल शाहू हायस्कूल बारामती जि पुणे,आरएमडी इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर, इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वेळापूर जि. सोलापूर,विद्याधाम विद्यामंदिर कणकवली जि. सिंधुदुर्ग,सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल, फुरसुंगी हरपळे वस्ती हवेली व आर के इंटरनॅशनल स्कूल तुळजापूर जि. धाराशिव या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडली पात्र विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या चेहऱ्यावरती परीक्षा दिल्याचा खूप आनंद पाहिला मिळाला, परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र ही संस्थेच्या वतीने देण्यात आले.दरवर्षी या परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या इस्रो अंतराळ प्रदर्शन भेट परीक्षेसाठी चालू वर्षाच्या डायमंड टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!