एक किलो प्लास्टिक द्या२ किलो साखर बक्षीस घ्या

सरपंच मानधन वेतनातून करणार बक्षिसाचा खर्च

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांचा स्तुत्य उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : आपल्या घरात प्लास्टिक पिशव्या येणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घ्यावी असे आवाहन कलमठ ग्रामपंचायत मार्फत केले आहे. सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक टाकू नका, घरात असलेले प्लास्टिक गोळा करून ठेवा, १ किलो प्लास्टिक गोळा करून ग्रामपंचायतला देणाऱ्याला बक्षीस म्हणून २ किलो साखर देणार असून त्याचा खर्च सरपंच मानधन मधून देणार असल्याचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी सांगितले. तेच प्लास्टिक रस्त्यावर टाकताना आढळल्यास दंड केला जाणार आहे. कलमठ गावात प्लास्टिक बंदी असून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई स्वच्छता निरीक्षक गणेश सावंत यांनी केली आहे. ‘स्वच्छ कलमठ संकल्प’ ही प्रत्येकाची जबाबदारी असून सर्वांनी सहकार्य कायम ठेवावे असे आवाहन सरपंच संदीप मेस्त्री यांनी ग्रामपंचायत कलमठच्या वतीने केली आहे. ग्रामपंचायत वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ संकुल स्पर्धेचे बक्षीस वितरण लवकरच केले जाणार असल्याचे सरपंच संदीप मेस्त्री म्हणाले. यामुळे कलमठ गावात सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक कमी होण्यासाठी मदत होईल, या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वं स्तरावरून कौतुक होतं आहे.

error: Content is protected !!