“उंबर्डेच्या सुपुत्राला मानद डॉक्टरेट; शिक्षण व समाजसेवेचा गौरव”

संदेश तुळसणकर यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल एशियन वेदिक रिसर्च अकाडमीतर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे गावचे सुपुत्र तथा अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल आणि कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय, वैभववाडी येथील शिक्षक संदेश तुळसणकर यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल एशियन वेदिक रिसर्च अकादमीतर्फे मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate) पदवी प्रदान करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संदेश तुळसणकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. तसेच सामाजिक बांधिलकी जपत जनजागृती, शैक्षणिक प्रबोधन आणि समाजहिताच्या अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अकाडमीने त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान बहाल केला. मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याने तुळसणकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव झाला असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा सन्मान भविष्यात अधिक जोमाने समाज, शिक्षण आणि जनजागृती क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या यशाबद्दल मित्रपरिवार, सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!