कणकवली (प्रतिनिधी) : तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई या राज्य संघटनेशी संलग्न तायक्वांडो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग या अधिकृत संघटनेची जिल्हास्तरीय १८ वी क्योरुगी व १३ वी पुमसे ज्युनिअर तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धा कणकवली येथे रविवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. दिनांक ०१:०१:२००८ ते दिनांक ३१:१२:२०१० या कालावधीत जन्मलेले खेळाडू सदर स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. प्रत्येक वजन गटातील विजयी खेळाडू रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.अधिक माहितीसाठी आयोजक चॅम्पियन तायक्वांडो अकॅडमी चे मंदार परब मो.9146427686 यांचेशी संपर्क करावा. जिल्ह्यातील जास्तीतजास्त खेळाडूंनी सदर स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
जिल्हास्तरीय ज्युनिअर तायक्वांडो निवड चाचणीचे आयोजन












