ओराेस (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मौजे कुसरवे तालुका मालवण येथील शेतकरी संजय चव्हाण यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भात शेतीचे भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, तहसीलदार मालवण वर्षा झाल्टे, तालुका कृषी अधिकारी मालवण अमोल करंदीकर तसेच महसूल,कृषी आणि ग्रामविकास विभागाचे संबंधित क्षेत्रिय अधिकारी, सरपंच व उपसरपंच वराड ग्रामपंचायत, पोलीस पाटील कुसरवे आणि इतर शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी उपस्थित क्षेत्रिय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या..
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची कुसरवे येथे शेती नुकसानीची पाहणी












