देवगड (प्रतिनिधी) : देवगड तहसिलदार यांच्या दालनात नवनियुक्त तालुका स्तरीय संजय गांधी योजना समितीची बैठक संपन्न झाली. अलिकडेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या शिफारशीने ही समिती गठीत करण्यात आली असून, अध्यक्षपदाची धुरा शिरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद विठ्ठल साटम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
या समितीत अशासकीय सदस्य म्हणून दिलीप वाडेकर (वाडा), शुभांगी राणे (दहिबांव), मनोज जाधव (हिंदळे), रामचंद्र कोकरे (वाघीवरे), सुहास राणे (कुवळे), भालचंद्र मांजरेकर (उंडिल), वैभव करंगुटकर (वाडातर), उदय पाटील (फणसगाव), प्रकाश राणे (हडपिड) यांचा समावेश आहे. तसेच गटविकास अधिकारी (पंचायत समिती देवगड), मुख्याधिकारी (नगरपंचायत देवगड) हे शासकीय प्रतिनिधी सदस्य असून तहसिलदार देवगड हे समितीचे सदस्य सचिव आहेत.
दि. ०४ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत तहसिलदार रमेश पवार यांनी अध्यक्ष मिलिंद साटम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर संजय गांधी नायब तहसिलदार यांनी सर्व सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
बैठकीत विधवा निराधार योजनेचे ३, दिव्यांग योजनेचे ७ आणि श्रावणबाळ योजनेचे ७ असे एकूण १७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
मंजूर लाभार्थ्यांमध्ये योगिता परब (इळये), सायली लोके (लिंगडाळ), सुरेखा कदम (जामसंडे), शुभम तांबे (मुटाट), नामदेव घाडी (मुटाट), ओवी सावंत (वळीवंडे), सिध्देश फाळके (विरवाडी), चंदना राणे (वरेरी), प्रतिक राण (वरेरी), रमेश घाडी (चांदोशी), बाळकृष्ण पुजारे (नाद), राजाराम तेली (मुटाट), रेश्मा लोके (लिंगडाळ), गोविंद पुजारे (कोटकामते), भिकाजी शिंगाडे (वरेरी), शंकर सोमले (गोवळ), मंगेश धुरी (चांदोशी) यांचा समावेश आहे.
बैठकीची सांगता नायब तहसिलदार श्री. खरात यांनी उपस्थितांचे आभार मानून केली.












