आचरा (प्रतिनिधी) : जनता विद्या मंदिर त्रिंबक हायस्कूलच्या नूतन अद्ययावत प्रयोगशाळा बनवण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल उद्योजक प्रकाश मेस्त्री यांचा आज संस्थाध्यक्ष सुरेंद्र (अन्ना) सकपाळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यवाह अरविंद घाडी, मुख्याध्यापक प्रवीण घाडीगांवकर, एकनाथ घाडी, विजय भाटकर, नंदकुमार घाडी, महेंद्र मांजरेकर, सुर्यकांत घाडीगांवकर, गिरगोल फर्नांडिस, सुनिता जाधव, सौ. शशिकला घाडीगांवकर आदी उपस्थित होते.
उद्योजक प्रकाश मेस्त्री यांचा त्रिंबक हायस्कूलच्या वतीने सत्कार…!











