वैभववाडी (प्रतिनिधी) : नगरपरिषद आणि नगरपंचायतची निवडणूक संहिता जाहीर झाली. खरतर, मतदार यादीतील घोळ संपे पर्यंत येणारी पुढील निवडणूक ही पुढे ढकलावी, म्हणून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईत उद्धव साहेबाच्या नेतृत्वात, काढलेला सत्याचा मोर्चा व त्याचा आवाज घेऊन, तो केंद्रिय निवडणूक आयोगाकडे पोचवावा म्हणून दिल्लीला त्यांची भेट घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तेव्हा त्यांना ही बाहेर ताटकळत बसावे लागले, ही खरतर, महाराष्ट्राची शोकांतिका आहे. पण, या महाराष्ट्रात पक्ष आणि चिन्ह चोरीला गेले (चंद्रकांत पाटील यांचे “शिवसेना ही उद्धव ठाकरेंची” या विधानाचा दाखल देत), जेथे एवढे मोठे सत्य फिके पडले, तेथे, या वोट चोरीचा मुद्दा दिल्लीस्वारांना मनावर घेण्याचा प्रश्नच नव्हता. पण लोकशाहीत अशाच सनदशिर मार्गाने जावे लागते.आता तर, सन्मानीय मुंबई हाय कोर्टाने सुद्धा काल दिलेल्या निकालात “आधी जाहीर झालेल्या मतदार यादीत न्यायालयाने हस्तक्षेप करता येणार नाही”, असे सांगून दुबार मतदार यादी बाबत याचिका निकाली काढली. खरतर, लोकशाही आता ह्या दोन्ही निकाला मुळे ,”दे माय धरणी ठाय” म्हणत त्रिकाली व्हेंटिलेटर वर जात आहे. आता फक्त जनतेला लोकशाही हवी असेल तर, आगामी नगर परिषद निवडुकीत तिला मतदानातून ऑक्सिजन पुरवून त्यांनीच तिला जगवायला पाहिजे. म्हणजे, मतदार यादी घोळ करून निवडणूक ओलिस ठेवून लोकशाही चा आर्या करण्याचा घाट या केंद्र आणि राज्य सत्तेतील नेत्याचा आहे. तो लोकांनीच हाणून पाडला पाहिजे…
निवडणूक ठेवली ओलीस आणि लोकशाहीचा केला…आर्या – संदीप सरवणकर











