कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत लोरे नं.1 आणि एस. एस .पी. एम लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या संयुक्त विद्यमानाने 15 वा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर अंतर्गत आरोग्य या उपक्रमाखाली मोफत आरोग्य तपासणी शिबिर आज दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय लोरे नं.1 येथे आयोजित करण्यात आली सदर शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी ,जनरल सर्जरी ,नेत्र तपासणी ,न्यूरोलॉजी ,युरोलॉजी कर्करोग, अस्थिरोग, प्रस्तुती शास्त्र आणि स्त्रीरोग तपासणी तसेच मोफत रक्त तपासणी या आरोग्य विषयक तपासणी समाविष्ट होत्या त्यासाठी एस.एस.पी.एम लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे येथील ,डॉ.सुधीर सांबरे G , मेडिसिन ,डॉ.संजय जोशी – आय स्पेशालिस्ट, डॉ.देवानंद उमटे -ऑर्थोपेडिक, डॉ.-अपेक्षा कुबल गायनॅकॉलॉजिस्ट, हे तज्ञ डॉक्टर व त्यांचे सहकारी ही उपस्थित होते या शिबिराला मा. सरपंच श्री.अजय रावराणे यांनी संबोधित करताना ही तपासणी सर्वांसाठी मोफत आयोजित केलेली असून जास्तीत जास्त ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे सांगितले. या शिबिराच्या माध्यमातून 35 नेत्र तपासणी, 7 स्त्री रोग तपासणी, व अन्य 62 असे एकूण मिळून 104 लाभार्थ्यांनी लाभ घेतला .सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.
लोरे नं.१ ग्रामपंचायतीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर












