“वाचाल तर वाचाल ” चे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे श्रीराम गवस !

९३ वर्षीय श्रीराम गवस यांना प्रभा प्रकाशन कडून पुस्तके भेट!

फोंडाघाट (प्रतिनिधी) : प्रभा प्रकाशन, कणकवली तर्फे दोडामार्ग – शिरवळ येथील ९३ वर्षाचे वयोवृद्ध वाचक एस.के. गवस यांना ग्रंथ वाचनाची आवड ! मात्र वयामुळे त्यांना बाहेर जाऊन ग्रंथ खरेदी करणे शक्य नाही. आणि त्यांना घरी सोबत करण्यासाठी ही कोणी नाही . याची दखल घेऊन प्रभा प्रकाशनातर्फे यांना शंभर ग्रंथ घरी जाऊन भेट देण्यात आले. फोंडाघाट येथील साहित्यिक संजय तांबे यांनी दि.३० आक्टोबर च्या साप्ताहिक किरात/ वैनतेय मध्ये तमसोमा ज्योतिर्गमय हे सुभाषित जपण्याची गरज हा लेख लिहिला होता. तो लेख श्रीराम गवस यांच्या वाचनात आला. त्यामुळे त्यांनी संजय तांबे यांच्याशी संपर्क साधला व आपली व्यथा मांडली. ते सेवानिवृत्त मुंबई पोलिस उपनिरीक्षक असून त्यांचे वय ९३ वर्षे आहे. घरी पत्नी आजारी असून ती अंथरुणाला खिळलेली आहे. घरात त्यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणीही नाही. मुलगा निवर्तला असून मुलगी तिच्या घरी असते. ती सुध्दा सेवानिवृत्त झाली आहे.त्यांच्या स्नुषा मुंबईत असतात. त्यांना मदतीचा हात म्हणून जवळची लोकं मदत करतात.त्यांच्या एकाकीपणात पुस्तके हेचं त्यांची सोबत करतात . त्यांना वाचनाची फार आवड आहे.त्यामुळे काहीतरी पुस्तकं असतील तर मला द्या अशी विनंती त्यांनी संजय तांबे फोंडाघाट यांच्याकडे केली. त्यांची ही व्यथा संजय तांबे यांनी प्रभा प्रकाशन चे प्रमुख साहित्यिक अजय कांडर यांच्या कानी घातली.त्यानुसार त्यानी प्रभा प्रकाशन तर्फे पुस्तके गवस यांना भेट देण्याचा निर्णय घेतला त्या नुसार त्यांच्या शिरवली ता.दोडामार्ग. येथील हरी ओम निवास स्थानी जावून त्यांना पुस्तके भेट देण्यात आली त्यात संजय तांबे व साहित्यिक. हरिश्चद्र भिसे यांनी ही आपली प्रकाशित पुस्तके दिली. या प्रसंगी साहित्यिक. अजय कांडर,मधुकर मातोंडकर.,हरिश्चंद्र भिसे व संजय तांबे उपस्थीत होते….

error: Content is protected !!