कणकवली वासियांसाठी आनंदाची बातमी, शहरात लवकरच सीएनजी पंप सुरू होणार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सीएनजी कार धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कणकवली शहरातील एसटी स्टँडनजीक च्या नवीन झालेल्या सीएनजी पंपावर आज सीएनजी फिलिंग ची यशस्वी टेस्ट घेण्यात आली. त्यामुळे आता लवकरच आता कणकवलीत सीएनजी पंप सुरू होणार आहे. शहरातील बस स्टँड च्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर आज सीएनजी ची यशस्वी चाचणी पार पडली. सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत सीएनजी गाड्यांमध्ये भरण्यात आला त्यामुळे लवकरच लवकर कणकवली शहरांमध्ये सीएनजी पेट्रोल पंप सुरू होणार आहे त्यामुळे कणकवली वासियांना ही आनंदाची बातमी आहे. कारण रिक्षा व्यवसायिक आणि कारचालक हे सीएनजी भरण्यासाठी सिंधुदुर्ग नगरी, फोंडाघाट ,तळेरे या ठिकाणी जातात.पण आता शहरातील सीएनजी पंप काही दिवसात सुरू झाला तर त्यांना जाण्या येण्याचा वेळ आणि खर्च देखील वाचणार आहे.

error: Content is protected !!