कणकवली (प्रतिनिधी) : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे वारे आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधाण्यासाठी काय केले ? आता सरकारवर टीका करताहेत. उद्धव आणि राज ठाकरे हे आपले अस्तित्व टिकविण्यासाठी टीका करताहेत. दोघांमध्येही सत्ता आणण्याची कुवत नाही. मुंबई महानगरपालिकेत इतकी वर्षे सत्ता असूनही आता प्रचार करावा लागतोय. मुंबईची ह्यांनी वाताहात लावली. राज्यात महायुतीच्या सरकार मध्ये विघ्न आणण्याचे आणि आपले राजकीय अस्तित्व जपण्याचे काम करताहेत. अशी टीका खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी संचालक महेश सारंग उपस्थित होते.
उद्धव-राज ची सत्ता आणण्याची कुवत नाही












