चौके (प्रतिनिधी) : मालवण धामापूर कुडाळ रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. त्यामध्ये काळसे ग्रामपंचायत समोरील रस्त्यावर भलामोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यामुळे याठिकाणी अनेक दुचाकीस्वार यांना अपघात होऊन जखमी होण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. हा वारंवार होणारा धोका लक्षात घेऊन काळसे ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ यांनी श्रमदान करून दगड आणि माती टाकून सदर धोकादायक खड्डा बुजवला. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी लिपिक दिनेश काळसेकर, शिपाई श्रीकृष्ण भाटकर, पाणीपुरवठा कर्मचारी उल्हास थवी, ग्रामस्थ चंदू बागवे, नागेश कारुडेकर, बंटी काळसेकर, यांनी श्रमदान केले.
काळसे ग्रामपंचायत समोरील धोकादायक खड्डा श्रमदानातून बुजवला












