यशराज प्रेरणा आचरा आणि वायंगणी विकास मंडळ आयोजित तालुकास्तरीय कविता स्पर्धा
अश्विनी सावंत व भूषण दत्तदास यांना उत्तेजनार्थ पारितोषिक
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील नवकवींना व्यासपीठ मिळावे, प्रतिभासंपन्न कवी निर्माण व्हावे या उदात्त हेतूने यशराज प्रेरणा आचरा व वायंगणी विकास मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा डिपोडिल्स रिसार्ट येथे आयोजित तालुकास्तरीय कविता स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे उद्घाटन आचरा उपसरपंच संतोष मिराशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच श्री देव रामेश्वर, भारत माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.
स्पर्धेत अनुराधा अनिरुद्ध आचरेकर यांनी प्रथम क्रमांक, मधुरा वझे यांनी व्दितीय क्रमांक तर मैत्रीय बांदेकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. अश्विनी सावंत प्रथम उत्तेजनार्थ, भूषण दत्तदास यांना व्दितीय उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सौरभ चव्हाण, सदगुरू साटेलकर, मेहेक शेख, नरेंद्र कोदे, स्वालिया शेख, योगेश मुणगेकर, अर्चना गव्हाणकर यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मंदार साबारी, रुजारिओ पिंटो, रामचंद्र कुबल यांनी आपल्या उत्कृष्ट कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी निलेश सरजोशी, अनुष्का गांवकर, जयप्रकाश परूळेकर, रविंद्र गुरव, बाबाजी मिसळे, भावना मुणगेकर, अशोक कांबळी, सचिन रेडकर, श्रीकृष्ण वायंगणकर, अनिरूद्ध आचरेकर, विनय वझे, स्वप्निल गोसावी, मानसी सरजोशी, राजेश भिरवंडेकर, खूशी बापट, गौरी बापट आदी रसिक प्रेक्षक उपस्थित होते.
परिक्षक म्हणून रुजारिओ पिंटो व रामचंद्र कुबल यांनी आपली भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश भिरवंडेकर यांनी तर बहारदार सुत्रसंचालन अक्षय सातार्डेकर आणि आभार ॲड. समृध्दी आसोलकर यांनी मानले.












