ओरोस (प्रतिनिधी) : कसाल बालमवाडी येथील साई माऊली हॉटेल शेजारी बस थांबा पिकप शेड येथे गुंगी कारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे गांजा सदृश्य पदार्थ बाळगल्या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
ध्रुव निशीत शाह (वय 22) रा. अमर विला 4/24 पहिला मजला के ए सुब्रमण्य रोड किंग सर्कल एसआयईएस शाळेजवळ माटुंगा मुंबई आणि फैजल फिरोज खान (वय 20) राह.रूम नंबर 107 अब्दुल रहमान पठाणी चाळ एस एम डी रोड साई हॉस्पिटल जवळ वडाळा पूर्व मुंबई अशी अटक केलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी पाच ते सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे गुंगी कारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधि.नियम1985 कलम 8(सी), 20(बी)ii ए प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कचरी सिद्धार्थ प्रभाकर कासले यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. कसाल बालमवाडी येथील साई माऊली हॉटेल शेजारी बस थांबा पिकप शेड येथे मंगळावर पहाटे ५ नंतर ध्रुव शाह आणि फैजल खान हे दोघे गैर-परवाना अवैध गांजा सदृश्य पदार्थ विक्रीसाठी स्वतःच्या ताब्यात घेऊन असल्याचे आढळून आले. एका प्लास्टिक पिशवीत हिरवट रंगाचा उग्र वासाचा गांजा सदृश्य ५३८ ग्रॅम पदार्थ त्यांच्याजवळ आढळून आला. २० हजार रुपये किमतीचा हा पदार्थ असून याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील हे करीत आहेत.












