स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा प्रचार मोर्चा सज्ज
मुंबई (प्रतिनिधी : महाराष्ट्र होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी चाळीस नेत्यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यात पहिला टॉप टेन मध्ये माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते विनोद तावडे, शिव प्रकाश जी., अशोक चव्हाण, पीयूष गोयल, सुधीर मुनगंटीवार अशा नेत्यांचा समावेश आहे.
याशिवाय मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, रावसाहेब दानवे-पाटील, ॲड. आशिष शेलार, राधाकृष्ण विखे-पाटील, मुरलीधर मोहोळ, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल, छ. शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, जयकुमार गोरे, मेघना बोर्डीकर, अमर साबळे, अतुल सावे, अशोक उईके, चित्रा वाघ, रक्षा खडसे, प्रवीण डेरेकर, डॉ. भगवत कराड, गोपीचंद पडळकर, डॉ. संजय कुटे, अमित साटम, धनंजय महाडिक, ॲड. माधवी नाईक, रंधीर सावरकर, अशोक नेते, मंगेश चव्हाण, प्रसाद लाड, इद्रिस मुल्तानी अशा एकूण चाळीस मंत्री, नेत्यांचा समावेश आहे.












