सिंधुदुर्गची कन्या नेहा जाधव ठरली ऑनलाइन सोलो डान्स स्पर्धेची मानकरी

राज्यभरातून तसेच राज्याबाहेरून 240 स्पर्धकांचा सहभाग

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अभिनेत्री आणि कोरिओग्राफर अश्विनी इरोळे यांच्या अश्वयुग महिला मंच तर्फे आयोजित ‘ऑनलाइन सोलो डान्स स्पर्धेत’ सिंधुदुर्गच्या नेहा लाडू जाधव (इन्सुली, सावंतवाडी) हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्वाधिक बक्षिसाची ठरली असून यात राज्यभरातून तसेच राज्याबाहेरून 240 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे एकूण बक्षिस मूल्य ₹4,50,000 इतके होते.

नेहा हिने आपल्या नृत्यकलेतून ‘महाराष्ट्राची शान – लावणी’ या पारंपरिक नृत्यप्रकाराचा जुना बाज सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तिच्या उत्कृष्ट अदाकारीमुळे परीक्षकांनी तिला पहिला क्रमांक प्रदान केला. बक्षीस वितरण सोहळा नटराज कोहिनूर ड्रीम्स अकॅडमी ऑफ फिल्म इन्स्टिट्यूट, शिरूर येथे पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून अश्विनी इरोळे यांनी विजेत्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाचे नियोजन सुरेखा पोटघन, रुपाली चौधरी, मनीषा खुपटे, विकास गायकवाड, संजू भंडारी आणि अविनाश आढाव यांनी केले, तर सरस्वती कटके यांनी सूत्रसंचालन केले. मंचाचे मार्गदर्शक लेखक-दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे यांनी या स्पर्धेस सुरुवातीपासून मार्गदर्शन केले.

नेहा जाधवच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!