आमदार दीपक केसरकर भाजपा जिल्हा कार्यालयात

पालकमंत्री नितेश राणे, माजी आ. प्रमोद जठार, प्रभाकर सावंत मनीष दळवींसोबत झाली बैठक

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी आज सायंकाळी ओरोस येथील भाजपा जिल्हा कार्यालयात दाखल होत पालकमंत्री तथा भाजपा निवडणूक प्रभारी नितेश राणे, निवडणूक प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार यांची भेट घेतली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी उपस्थित होते. जिल्ह्यात नगरपरिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत भाजपा शिवसेना युतीबाबत वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. यअनुषंगाने दीपक केसरकर यांनी भाजपा जिल्हा कार्यालयात जाऊन पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीला महत्व आहे. सावंतवाडी येथे आ. केसरकर यांच्या निवासस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी भाजपाच्या वतीने मंगळवारी युतीबाबत चर्चा केली होती.त्यांनतर लागलीच दुसऱ्या दिवशी आमदार दीपक केसरकर यांनी ओरोस येथे भाजपा जिल्हा कार्यालयात पालकमंत्री नितेश राणे, प्रमोद जठार यांच्या घेतलेल्या भेटीमुळे युतीच्या घडामोडींना वेग आला आहे. युतीबाबत येत्या दोन दिवसांत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!