कणकवली नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे यांची एकमेव झाली मुलाखत

समीर नलावडेंच्या उमेदवारीची अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी

कणकवली (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी आज कणकवली नगरपंचायत निवडणूक साठी झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत नगराध्यक्ष पदासाठी एकमेव समीर नलावडे यांचा अर्ज आल्याने फक्त समीर नलावडे यांचीच मुलाखत झाली. कणकवली नगरपंचायत निवडणूक साठी भाजपाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज ओम गणेश बंगल्यावर पार पडल्या. पालकमंत्री नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार , जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा संघटक शैलेंद्र दळवी, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या उपस्थितीत आज भाजपाच्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. या मुलाखतीचा अहवाल प्रदेश कार्यालयात दिला जाणार असून प्रदेश कार्यालयाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यावर भाजपाच्या अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी समीर नलावडे यांची एकमेव मुलाखत झाल्यामुळे नलावडे यांचे नाव भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जाहीर होण्याची केवळ औपचारिता शिल्लक आहे.

error: Content is protected !!