ट्रक – मोटरसायकल अपघातात दोघे ठार

चिरेवाहतूक करणाऱ्या ट्रकची मोटरसायकल ला धडक

कणकवली (प्रतिनिधी) : कासार्डे ते विजयदुर्ग या राज्य मार्गावर वेळगिवे येथील वळणावर झालेल्या भीषण अपघातात देवगड तालुक्यातील पाटगाव येथील दोन जण जागीच ठार झाले आहेत. मृत सुधाकर गुरव आणि अनंत गुरव हे दोघेही मित्र होते. हा अपघात दुपारी तीनच्या सुमारास घडला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला असून, चिरे वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!